Blog

April 8, 2021

कोविड -19 व हृदयविकार by Dr. Atul Patil

कोविड -19 व हृदयविकार by Dr. Atul Patil

(MBBS, DNB – General Medicine, DNB – Cardiology)

2019 शेवटी चीनमधून सुरू झालेली Covid 19 या आजाराची साथ 2020 मध्ये सर्व जगभरात पसरली .बघता बघता हजारो-लाखो लोकांना या आजाराचा संसर्ग झाला व खूप मोठ्या प्रमाणात लोकांना आपला जीवही गमवावा लागला . पेशंटवर उपचार करताना असे लक्षात आले की ज्या पेशंटला पूर्वी डायबिटीस, उच्च रक्तदाब हृदयाचे आजार असतील अशा पेशंटमध्ये हा आजार खूप गुंतागुंतीचा होऊन मृत्यूचे प्रमाण हे इतर पेशंट पेक्षा जास्त आहे . परंतु आज Covid vaccine च्या रूपाने हा आजार नियंत्रण करण्यासाठी एक आशेचा किरण आपल्याला दिसत आहे. परंतु ही लस कोणी घ्यावी याविषयी पेशंटच्या मनात बरीच भीती व संभ्रम आहे. विशेष करून हृदयरोग असणाऱ्या पेशंटमध्ये vaccine मुळे काही अपाय तर होणार नाही याविषयी मोठी भीती आहे .

जगभरातील सर्व चाचण्यांमध्ये​​ असे दिसून आले आहे की Covid आजारावरील लस रक्तदाब, मधुमेह तसेच हृदयविकाराच्या सर्व प्रकारच्या रुग्णांमध्ये सुरक्षित आहे.

बऱ्याच रुग्णांना हृदयविकाराच्या समस्येसाठी घेत असलेल्या रक्त पातळ औषधाबद्दल काळजी वाटते.हृदयरोगी मुख्यत्वे दोन प्रकारच्या रक्त पातळ करण्याच्या गोळ्या घेत असतात. त्यातील पहिला प्रकार म्हणजे ऑंटी प्लेटलेट औषधे जसे की ऍस्पिरिन, क्लोपिदोग्रेल या औषधांचा समावेश असतो . ही औषधे सहसा एंजियोप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रियेनंतर दिले जातात. दुसरा प्रकार म्हणजे अँटिकोएगुलेशन . या प्रकारात Warfarin या औषधांचा समावेश होतो. ही औषधे सामान्यत: हृदयाच्या झडपांचे शस्त्रक्रिया म्हणजे वॉल रिप्लेसमेंट शस्त्रक्रीया, तसेच हृदय किंवा फुफ्फुसातील रक्त गुठळ्या असलेल्या रुग्णांना दिल्या जातात. पहिल्या प्रकारातली औषधे म्हणजे अँटीप्लेटलेट औषधे घेत असलेल्या रूग्णांनी ताबडतोब लस घ्यावी व लसीकरण करण्यापूर्वी किंवा नंतर ही औषधे थांबवू नये. परंतु दुसऱ्या प्रकारातील औषधे म्हणजेच अँटिकोएगुलेशन घेत असलेल्या रुग्णांनी त्यांचे रक्त किती पातळ आहे हे समजून घेण्याची तपासणी म्हणजेच पीटी-आयएनआर (PT-INR) नावाची रक्त तपासणी करावी आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर आयएनआर 3 पेक्षा कमी असेल तर ते सुरक्षितपणे लस घेऊ शकतात. जर ते 3 पेक्षा जास्त असेल तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर औषधाचा डोस समायोजित करावा आणि नंतर औषध घ्यावे. त्यांनी लसीकरणानंतर इंजेक्शन घेतलेल्या ठिकाणी तीन ते पाच मिनिटे दाबून ठेवावे .

म्हणून सर्व हृदयरोग्यांनी कोणत्याही भीती कोविड -19 ची लस घ्यावी कारण अशा सर्व पेशंट मध्ये Covid हा आजार गुंतागुंतीचा व जीवघेणा ठरू शकतो आणि म्हणूनच त्यांना या लसीचा जास्तीत जास्त फायदा होईल.
तसेच डायबिटीस व उच्च रक्तदाब असणाऱ्या पेशंटनी त्यांची या आजारांवरील कुठलीही औषधे बंद न करता लस घ्यावी.

Uncategorized
About bestcardiologistnashik